पुणे कलेक्टिव्हच्या दुसऱ्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत!
कथा दोन लॉकडाऊनची
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत जेष्ठ राजकीय नेते, कुलगामचे माजी विधानसभा सदस्य, मोहम्मद युसूफ तारिगामी आणि शांतता कार्यकर्त्या व काश्मीर टाइम्सच्या संपादिका, अनुराधा भसीन.
दोन्ही वक्ते आपल्यासमोर जम्मू आणि काश्मीरच्या लॉकडाऊनची कथा मांडणार आहेत. कलम ३७०, जम्मू काश्मीरचा राज्य दर्जा हटवल्या नंतरची परिस्थिती, इंटरनेट तसेच दळणवळणाच्या साधनांवर असणारी बंदी, पत्रकारितेवर आलेले निर्बंध, अगदी कोरोना काळात देखील उपलब्ध असणारी अपुरी संसाधने त्यामुळे निर्माण झालेले मूलभूत प्रश्न इत्यादी विषय ते आपल्या मांडणीतून समोर आणतील.
हा कार्यक्रम हिंदी आणि इंग्रजीत असणार आहे.
दिनांक ८ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजता तुम्ही पुढील लिंकद्वारे लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता.
https://facebook.com/
आता युट्युबवर देखील उपलब्ध