युद्धखोरी थांबवा!

गाझापट्टीत तात्काळ शांतता प्रस्थापित करा!

७ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘हमास’ या अतिरेकी संघटनेने इस्रायलमध्ये हल्लेखोरी केल्यावर इस्रायलने आक्रमक भूमिका घेऊन गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव करून भीषण युद्ध सुरू केलेलं आहे. इस्रायल ‘स्वतःच्या संरक्षणा’ची भूमिका घेऊन गाझापट्टीतील हजारो निरपराध पॅलेस्टिनी लोकांचे बळी घेत आहे; त्यांची घरदारं उद्ध्वस्त करत आहे. आम्ही युद्धखोरीचा तीव्र निषेध करतो आणि हे युद्ध तात्काळ थांबवावं असं आवाहन करतो.

वीस लाखावर वस्ती असलेल्या गाझापट्टीवर सतत हल्ले सुरू आहेत. तेथील हॉस्पिटल्स, दवाखाने आणि आश्रयस्थानांवर निर्दयपणे हल्ले केले जात आहेत. त्यामुळे हल्यांमध्ये जखमी झालेल्यांवर उपचारही होऊ शकत नाहीत. तेथील जनतेला अन्न, पाणी, इंधन सर्व मूलभूत गोष्टींपासून वंचित करून त्यांना स्थलांतर करायला भाग पाडलं जात आहे. अनेक स्त्रिया, मुलं, वृद्ध यांचे हाल केवळ अमानुष असेच आहेत. अमेरिका व पाश्चात्य देश अशा नरसंहारासम कृत्यांचं, अमानुषतेचं सक्रिय समर्थन करत आहेत, हे निषेधार्हच आहे. त्याचप्रमाणे, भारतातील बहुतांश प्रसारमाध्यमंही पाश्चात्य कथनानुसार पक्षपाती भूमिका घेऊन वा अपप्रचार करून युद्धखोरीचं समर्थनच करत असल्याचं चित्र आहे. 

‘दहशतवाद विरोधी युद्धा’च्या नावाखाली अमेरिकेने यापूर्वी इराक, अफगाणिस्तान आदी देशांमधील अनेक निरपराध लोकांचे बळी घेतले आहेत आणि जनजीवन उद्धवस्त केलेलं आहे, हा इतिहास आहे. इस्रायलने तर पॅलेस्टाइनचा मोठा भूभाग बळकावला आहेच, पण गेली सुमारे पाच दशकं वेस्ट बँक आणि गाझापट्टीमधील पॅलेस्टिनी जनांचा सातत्याने जिवंत छळ करत आहे. गाझापट्टी भाग तर गेली कित्येक वर्षं खुला तुरुंग ठरल्यागत स्थिती आहे. 

युद्धखोरी आणि असा छळवाद तात्काळ बंद करून इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाबाबत शांततापूर्ण तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू करावेत, अशी आग्रही भूमिका भारत सरकारने घ्यावी, असे संयुक्त आवाहन आम्ही पुण्यातील विविध संघटना आणि नागरी समाज-गट करत आहोत. 

Stop The War!

Ensure peace is regained in Gaza immediately.

Join the movement in support of Palestine and take a stand against the unjust treatment and suppression they are enduring. Unite with progressive voices to denounce the system of apartheid and reject the idea of war. Together, we have the power to make a significant impact.

Come together with the Punecollective and numerous other progressive organizations in Pune as we strive to show our support for this crucial cause.

When: 27 Oct 2023, Friday

Time: 5 pm onwards

Where: Goodluck Chowk, Pune

Website: https://punecollective.in

Watch this space for updates.

Facebook: https://facebook.com/punecollective

Youtube: https://www.youtube.com/@punecollective

Twitter: https://twitter.com/punecollective

Instagram: https://instagram.com/punecollective