साड्डा हक़!

तू धरती की मांग संवारे सोए खेत जगाए
सारे जग का पेट भरे तू अन्नदाता कहलाए
फिर क्यो भूख तुझे खाती है और तू भूख को खाए
लुट गया माल तेरा लुट गया माल ओए
पगड़ी संभाल जट्टा.

पुणे कलेक्टिव्हच्या नवव्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत!
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १९ डिसेंबर २०२० रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.

गेले काही महिने तीन कृषी कायद्यांवरुन देशभरात गदारोळ सुरू आहे. हजारो शेतकरी थंडी वाऱ्याची पर्वा न करता भाजप सरकारने आणलेल्या जाचक कृषी कायद्यां विरोधात लढत आहेत. शेतकरी संघटनांनी वारंवार सांगूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना रस्त्यावरती येऊन आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणता मार्गच शिल्लक नव्हता. अन्नदाता दिल्लीपर्यंत पोहोचू नये यासाठी भाजप सरकारने त्यांना शक्य त्या सर्व प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला मग कधी त्यांचे येण्याचे रस्ते जेसीबी लावून उखडले तर कधी ऐन कड्याकाच्या थंडीत पाण्याच्या प्रचंड फवाऱ्यांनी हैराण केलं. इतक्या त्रासानंतरही शेतकरी बड्या कष्टानं आणि धीरानं दिल्लीला पोहोचला. आधीप्रमाणे याहीवेळी गोदी मिडीयाने आंदोलकांना फुटीरतावादी, पैसे घेऊन काम करणारे भाडोत्री वगैरे विशेषणं लावून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरुन तर आयटी सेल आणि ट्रोल्सची फौज उतरवली गेली.

इतकं सगळं झाल्यानंतरही शेतकरी संघटना आणि रस्त्यावरच्या हजारो शेतकऱ्यांनी आपला संयम ढळू न देता शांतिपूर्वक आणि लोकशाही मार्गानी आपला लढा पुढे चालू ठेवला आहे. या कृषी विरोधी तसेच कार्पोरेट धार्जिण्या कायद्याचा देशातील शेतकऱ्यांना पर्यायाने सामान्य जनतेला प्रचंड त्रासदायक परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे आता आपल्यासारख्या सामान्य जनतेनी आपली जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे.

या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला कृषी विधेयक आणि सध्या चालू असणाऱ्या आंदोलनाशी संबंधित या चर्चासत्रात आमंत्रित करत आहोत. यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत सामाजिक आणि आर्थिक विषयांचे अभ्यासक व कार्यकर्ते अमित नारकर; तसेच कृषी शास्त्रज्ञ व अखिल भारतीय किसान सभेचे इंद्रजित सिंग .

हा कार्यक्रम मराठी आणि हिंदीत असणार आहे.

फेसबुक:
https://facebook.com/punecollective

युट्युब:
https://www.youtube.com/c/punecollective

ट्विटर:
https://twitter.com/punecollective

वेबसाईट:
https://punecollective.in

#किसानआंदोलन #किसानबाग
#जागरलोकशाहीचा #पुणेकलेक्टिव्ह
#FarmersProtest #KisanBagh
#PuneCollective #PuneCollective2020
#IdeasOfIndia #Democracy #Freedom #Pluralism