सतीश काळसेकर यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या विशाल सांस्कृतिक परिवाराला अतीव शोक होत आहे. हा परिवार केवळ शहरी महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून राज्याच्या दुर्लक्षित, दुर्गम भौगोलिक आणि सामाजिक प्रदेशात वसलेला आहे. त्याहीपलिकडे जात इतर भारतीय भाषिकांशीही त्यांनी जिव्हाळ्याचे मैत्र जोडले होते. जाणिवेच्या स्तरावर तर त्यांचा मैत्रभाव वैश्विक होताच, पण जगभरातील विविध प्रकारच्या वाङ्मयकृतींशी देखील त्यांनी एक हृद्य नाते प्रस्थापित केले होते. आफ्रिकेतील कवींपासून ते लॅटिन अमेरिकेतील नवनव्या कादंबरीकारांशी त्यांचा वाचनातून सदैव संवाद चालायचा आणि त्या संवादात ते आपल्या प्रत्येक सुहृदाला निर्व्याज भावनेने सहभागी करून घ्यायचे.
या संवादाचे बीज हा विशाल हृदयाचा माणूस आपल्यात रुजवत आला. ते वृद्धिंगत करणे, हे आपल्या मानुषतेचे एक चिन्ह आहे. तो संवाद करत राहणे हीच त्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. हा संवाद सामुदायिकपणे करण्यासाठी कोव्हिडच्या बंधनकाळात ऑनलाईन मंचावर जास्तीत जास्त लोकांना एकत्र येणे शक्य आहे.
म्हणूनच दिनांक २ ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान सतीश काळसेकरांच्या विपुल मित्रपरिवारातील काहींनी एकत्र येऊन, सतीश काळसेकर यांच्या स्मृतींच्या आठवणींचा कार्यक्रम आयोजित केला आहे. फेसबुक, यु ट्यूब, ट्विटर अशा विविध समाज माध्यमांवरून हे कार्यक्रम प्रसारित होतील. आपण आपल्या मित्रपरिवारासह मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती.
📌।। दिवस पहिला ।।
सोमवार दि. २ ऑगस्ट २०२१
📍।। विशेष व्याख्यान ।।
👉प्रमुख वक्ते : एजाज़ अहमद
(ज्येष्ठ विचारवंत, जागतिक साहित्याचे अभ्यासक, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया)
👉विषय : आय कान्ट ब्रीद..!
📌।। दिवस दुसरा ।।
मंगळवार दि. ३ ऑगस्ट २०२१
📍।। परिसंवाद : सतीश काळसेकर आणि लघुअनियतकालिक चळवळ ।।
👉सहभाग : चंद्रकांत पाटील, अर्जुन डांगळे, कुमार केतकर, भालचंद्र नेमाडे
📌।। दिवस तिसरा ।।
बुधवार दि. ४ ऑगस्ट २०२१
📍।। कविसंमेलन : सोडले नाही कवितेने ।।
👉सहभाग : राजेश जोशी, अरुण कमल, कुमार अम्बुज, संजय भिसे, बसन्त त्रिपाठी, वसंत आबाजी डहाके, वसंत दत्तात्रेय गुर्जर, प्रभा गणोरकर, गुरुनाथ सामंत, मलिका अमरशेख, प्रज्ञा दया पवार, नीळकंठ कदम, प्रवीण बांदेकर, किरण येले, आनंद विंगकर, वर्जेश सोलंकी, रमेश इंगळे उत्रादकर, श्रीधर नांदेडकर, विकास पालवे
📌।। दिवस चौथा ।।
गुरुवार दि. ५ ऑगस्ट २०२१
📍।। अभिवादन सभा : आठवणीतले काळसेकर ।।
👉सहभाग : उदय प्रकाश, विजय कुमार, जितेंद्र भाटिया, डॉ. रत्नशंकर पांडे, रंगनाथ पठारे, सुमती लांडे, जयप्रकाश सावंत, दौलतराव हवालदार, डॉ. भालचंद्र कानगो, प्रकाश बुरटे, सुधीर पटवर्धन, उर्मिला पवार, डॉ. रणधीर शिंदे
वरील सर्व कार्यक्रम ‘पुणे कलेक्टिव्ह’च्या फेबसुक पेजवरून, युट्युब आणि ट्विटर चॅनल वरून थेट प्रक्षेपित केले जातील.
दिनांक २ ते ५ ऑगस्ट २०२१ दरम्यान, संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढीलपैकी कोणत्याही लिंकद्वारे तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
Youtube: https://www.youtube.com/c/punecollective
Twitter: https://twitter.com/punecollective
Facebook: https://facebook.com/punecollective