राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० : मनुजन हिताय, मनुजन सुखाय!

शनिवार १६ ऑक्टोबर २०२१, संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या पुणे कलेक्टिव्हच्या या कार्यक्रमासाठी आम्ही आपणांस निमंत्रित करीत आहोत.

शिक्षण हक्क कायदा २००९ ने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मूलभूत हक्क दिला. केवळ संधी नाही, तर प्रत्येकासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ध्येय. महात्मा जोतिबा फुलेंनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण हा घटनात्मक अधिकार असावा असं वाटायचं. हे उद्दिष्ट नंतरच्या अनेक पुरोगामी प्रयत्नांनी शिक्षण हक्क कायद्यात रुपांतरित झाले. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० काळाची चाके उलटी फिरवू पाहत आहे.

शिक्षणतज्ज्ञांनी या धोरणाबाबत विचारलेल्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. संसदेत चर्चा न करता, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकार हे धोरण देशाच्या माथी मारत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचे वर्चस्व आणि नियंत्रण आणण्याचा कार्यक्रम आहे.

लवचिकतेच्या नावाखाली कौशल्यशिक्षणाचे कोर्सेस देऊन इयत्ता तिसरीपासूनच मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणातून बाहेर ढकलण्याचा रस्ता या धोरणाने तयार केला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी प्रत्यक्ष शिक्षणाचे महत्व कमी करून त्याऐवजी ऑनलाईन आणि आभासी शिक्षणाला माथी मारण्यात येत आहे. या सर्व अडथळ्यांमुळे आज लाखो मुलं गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित होण्याच्या मार्गावर आहेत. काही निवडक लोकांचे हितसंबंध जपू पाहणाऱ्या या धोरणाला नव-मनुवाद असचं म्हणावं लागेल.

बड्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी तसेच काही निवडक लोकांच्या नफ्यासाठी शिक्षणाची ही अधोगती पर्यायाने एकूण समाजाची होणारी परवड नाकारणं आज गरजेचं आहे.हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही आपल्याला ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: मनुजन हिताय, मनुजन सुखाय!’ या चर्चेत आमंत्रित करीत आहोत.

यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत, जागतिक किर्तीचे लेखक, अर्थतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक, प्रा. प्रभात पटनाईक; तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक वर्ष शिकवण्याचे काम करणारे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व ऍक्टिव्ह टिचर्स फोरमचे संयोजक, भाऊसाहेब चासकर आणि शिक्षणतज्ज्ञ, लोकविज्ञान चळवळीतील कार्यकर्त्या व पुणे कलेक्टिव्हच्या सदस्य, गीता महाशब्दे.

हा कार्यक्रम मराठी आणि इंग्रजीत असणार आहे.

Watch this space for updates.

Facebook: https://facebook.com/punecollective

Youtube: https://www.youtube.com/c/punecollective

Twitter: https://twitter.com/punecollective

Instagram : https://instagram.com/punecollective

Telegram : https://t.me/punecollective

Mailing List : http://eepurl.com/ha9mXT

Website: https://punecollective.in

#पुणेकलेक्टिव्ह #PuneCollective

#NEP #NEP2020 #राष्ट्रीयशैक्षणिकधोरण२०२०