पुणे कलेक्टिव्हच्या आठव्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत!
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
मीडिया की बात!
गेल्या काही वर्षांपासून माध्यमांमधील बातम्यांमध्ये निःपक्षपातीपणा आणि नैसर्गिकता यांचा अभाव जाणवत आहे. सामान्य जनतेच्या बाजूने उभे रहात त्यांचा आवाज बनून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी माध्यमं नवं भांडवलदारांच्या दावणीला बांधली गेली आहेत. आदर्श पत्रकारिता संपादकीय पानांवरून किंवा मत व्यक्त करणा-या सदरांमधूनही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. टिआरपी मिळवण्याच्या स्पर्धेमुळे पत्रकारितेच्या नितीमुल्यांचा बळी जातो आहे. बातमी देण्याचा वेग याला महत्व येऊन घटनांची पडताळणी आणि फेरपडताळणी करणे हा शिरस्ता मागे पडला आहे. काही सन्मानीय अपवाद वगळता सर्वत्र निरर्थक किंचाळण्याची जणू अहमहिका सुरु आहे.
सशक्त लोकशाहीच्या अस्तित्वासाठी माध्यमांची भूमिका आणि जबाबदारी महत्वाची असते हे आपण सर्व जाणतो. या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला माध्यमांच्या संदर्भातील चर्चासत्रात आमंत्रित करत आहोत.
यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत पत्रकार, माध्यम अभ्यासक, इंडी जर्नलचे संस्थापक, संपादक प्रथमेश पाटील; तसेच माध्यम शिक्षक, विश्लेषक व लेखक, प्रा. जयदेव डोळे आणि जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक व लेखक, परंजय गुहा ठकुरता.
हा कार्यक्रम मराठी आणि हिंदीत असणार आहे.
फेसबुक:
https://facebook.com/punecollective/live
युट्युब:
https://www.youtube.com/c/punecollective/live
ट्विटर:
https://twitter.com/punecollective
वेबसाईट:
https://punecollective.in