कार्ल मार्क्स… नाव ऐकलं की लगेच डोळ्यासमोर काय येतं? क्रांती? वाद? इतिहास? की एक जुना विसरलेला सिद्धांत?
पण जर तुम्हाला असं सांगितलं की मार्क्स परत आलाय – आणि बोलायला लागलाय… अगदी आपल्या आजच्या जगाबद्दल?”
कार्ल मार्क्स – इतिहास, राजकारण, तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांमधला एक मोठा चेहरा. पण त्या चेहऱ्यामागचा माणूस कसा होता?
युरोपमधून निर्वासित झाल्यावर लंडनच्या सोहोमधल्या कामगार वस्तीमध्ये जगलेला, आर्थिक तंगीला सामोरा गेलेला, कधी लेखणीने झगडणारा, कधी स्वतःच्या कुटुंबासाठी असहाय्य होणारा.
या नाटकात तो चुकून न्यूयॉर्कच्या सोहोमध्ये येतो. पण तो बोलायला लागला की, वाटतं – हा तर आपल्याच आजूबाजूचे बोलतोय.
त्याचे सिद्धांत, त्याचे अनुभव, आणि त्याचं दु:ख – हे सगळं एकाच वेळेस अंतर्मुखही करतं आणि प्रश्नही विचारायला भाग पाडतं.
तर ‘मार्क्स मेला आहे’ हे पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या लोकांशी गप्पा मारायला मार्क्स स्वतः येतोय, आपणही या.
जनपद आणि पुणे कलेक्टिव्ह आयोजित,
प्रत्यय कोल्हापूर निर्मित,
दोन अंकी नाटक
मार्क्स इन सोहो
मूळ लेखक – हॉवर्ड झीन
रूपांतर – साहिल कल्लोळी
दिग्दर्शन – डॉ शरद भुथाडिया
रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५,
संध्याकाळी ७.३० वाजता
द बॉक्स, पुणे
देणगी मूल्य – ३०० (प्रवेश अग्रक्रमानुसार)
संपर्क – ओंकार 9420123091, समीर 9028797392