मित्रहो,
पुणे कलेक्टिव्ह आणि शंकर ब्रह्मे समाज-विज्ञान ग्रंथालय तर्फे, शनिवार, २६ ऑगस्ट २०२३ रोजी रोजी पुढील व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
“मणिपूरायण”
– प्रमुख वक्ते – संगीता बरूआ पिशारोती
(ज्येष्ठ पत्रकार, लेखिका, संपादक: राष्ट्रीय घडामोडी, द वायर)
मणिपूरमध्ये जे काही घडलं ते म्हणजे भारतात दडपलेल्या जातीजमातींमधल्या स्त्रियांविरुद्ध जे काही शतकानुशतके करण्यात आले आहे त्याचीच संतापजनक पुनरावृत्ती आहे. आपल्या देशात या घटनेचा धिक्कार जितका व्हायला हवा तितका आणि तात्काळ झाला नाही ही देखील एक भयानक बाब आहे. राष्ट्रभरातील माध्यमांनी पण या बलात्काराची बातमी बाहेर आल्यानंतरच त्याची दखल घेऊन बातम्या द्यायला सुरुवात केली. जर असे व्हिडिओ आल्यानंतरच मीडिया नोंद घेणार असेल तर मग प्रत्येक वेळी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघाल्याचे व्हिडिओज निघायला हवेत काय? हिंसाचार हा सेन्सेशनल रूपात दाखवला तरच तो दखलपात्र ठरतो ही आजचे भीषण वास्तव आहे. परंतु, ही केवळ एक घटना नाही, गेले जवळपास तीन महिने मणिपूरमध्ये व्यापक प्रमाणावर अनेक भीषण आणि हिंसक घटना घडत आहेत; शेकडो मृत्युमुखी पडले आहेत. हजारो बेघर झाले आहेत. ज्या कारणांस्तव समाजघटकांमध्ये विद्वेषाचा उद्रेक होऊन मणिपूरमध्ये अशी कटु परिस्थिती निर्माण झाली, ती कारणं जाणून घेणं आवश्यक आहे.
तसेच ही घटना केवळ मणिपूर पुरती मर्यादित आहे असे न मानता अशाप्रकारे महाराष्ट्रातील आदिवासी समजात अंतर्गत धार्मिक द्वेष पेरण्याचे कारस्थान कोणी करत असेल तर त्याबाबत आपण जागरूक राहून आदिवासी आणि विविध समाजातील एकोपा कायम राहण्यासाठी प्रयत्न करणे याचीही गरज आज निर्माण झाली आहे
या सर्व मुद्यांची तीव्रता समजून घेण्यासाठी, आम्ही तुम्हाला शनिवार, २६ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या “मणिपूरायण” या सत्रात आमंत्रित करत आहोत.
पुणे कलेक्टिव्हच्या या सत्रात, आपल्या सोबत संवाद साधणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार, लेखिका तसेच द वायरच्या राष्ट्रीय घडामोडी संपादक, संगीता बरूआ पिशारोती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, कवी-लेखिका व भाषा अभ्यासक डॉ. माया पंडित या अध्यक्ष म्हणून व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे, डॉ. संजय दाभाडे समन्वयक म्हणून सहभागी होतील.
“मणिपूरायण”
शनिवार, २६ ऑगस्ट २०२३
शंकर ब्रम्हे ग्रंथालयाचे लोकायत सभागृह,
इन्फिनिटी काँप्लेक्स, ३ रा मजला,
१२९ ब/२, कॅनरा बँकेसमोर
लॉ कॉलेज रस्ता, पुणे ४११००४
विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन कृपया या कार्यक्रमास निश्चित उपस्थित राहावं आणि आपल्या मित्र-मैत्रिणींनाही कळवावं. सोबत निमंत्रण पत्रिका जोडली आहे.
हे सत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.
संपर्क – ज्ञानेश्वर – 9970194700 निखिल – 9130082931
Watch this space for updates.
Facebook: https://facebook.com/punecollective
Youtube: https://www.youtube.com/c/punecollective
Twitter: https://twitter.com/punecollective
Instagram: https://instagram.com/punecollective
Website: https://punecollective.in