केरळ आरोग्य मॉडेल, एक पाऊल सार्वत्रिक आरोग्य सेवेकडे!

जन आरोग्य मंच, पुणे

पुणे कलेक्टिव्ह

आयोजित

व्याख्यान – केरळ आरोग्य मॉडेल, एक पाऊल सार्वत्रिक आरोग्य सेवेकडे!

व्याख्यात्या : श्रीमती के. के. शैलजा टीचर (माजी आरोग्य मंत्री, केरळ)

दिनांक: ११ सप्टेंबर २०२२

वेळ: दुपारी ३.३० वाजता

स्थळ: एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, पुणे

कोविड काळात व त्यापुर्वी निपाह विषाणूच्या साथीत केरळ राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे व व्यवस्थापनाचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. या सर्व टिमच्या प्रमुख व त्या वेळच्या आरोग्य मंत्री कॉ. के. के. शैलजा टिचर या पुण्यात येत आहेत. त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी व चर्चा करण्यासाठी, जन आरोग्य मंच, पुणे व पुणे कलेक्टिव्ह हे जाहीर व्याख्यान व चर्चा आयोजित करत आहे.

केरळ सातत्याने मानव विकास निर्देशांकात देशात प्रथम क्रमांकावर कसा काय? केरळच्या आरोग्य व्यवस्थेची बलस्थानं काय आहेत? केरळकडून भारतातील इतर राज्यांनी शिकण्यासारखं काय आहे? आरोग्याच्या बाबतीत सरकारांची जबाबदारी काय असायला हवी? या व अश्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कार्यक्रमातून मिळू शकतील. तरी आरोग्य चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, डॉक्टर, पॅरामेडिक स्टाफ तसेच उत्सुकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.

भेटूयात रविवार, दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी, दुपारी ३.३० वाजता, एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे.

हा कार्यक्रम पुणे कलेक्टिव्हच्या सोशल मीडियावरून प्रसारित केला जाईल.

Watch this space for updates.

Facebook: https://facebook.com/punecollective

Youtube: https://www.youtube.com/c/punecollective

Twitter: https://twitter.com/punecollective

Instagram: https://instagram.com/punecollective

Website: https://punecollective.in

#जनआरोग्यमंच #पुणेकलेक्टिव्ह

#PeoplesHealthForum #PuneCollective