गोविंद पानसरे स्मृती व्याख्यान २०२१

गेल्या काही वर्षांत देशात अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली आहे. संविधानिक मुल्ये व लोकशाही व्यवस्थेवर होणारे हल्ले ही देशातील नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. एन.आर.सी. – सी ए.ए. विरोधी दीर्घ आंदोलन, कोविड-१९ महामारी व सध्या चालू असलेले शेतकरी आंदोलन आणि केंद्र शासनाचा असंवेदनशील, संविधानविरोधी व्यवहार देशाला भविष्यात कोणत्या देशेने घेऊन जाईल याची चिंता सर्वच विवेकी, संवेदनशील नागरिकांना आहे.

या पार्श्वभूमीवर २० फेब्रुवारी, २०२१ रोजी सायंकाळी ६ वा. एन.डी.टी.व्ही. वाहिनीचे कार्यकारी संपादक व निर्भीड पत्रकार श्री. रवीशकुमार यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ते “भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध” या विषयावर व्याख्यान देतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत व राज्यसभा सदस्य श्री. कुमार केतकर भूषवणार आहेत.

आपण सर्वानी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवावा असे पुणे कलेक्टिव आपणा सर्वाना आवाहन करते आहे.
या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आपण पुणे कलेक्टिवच्या फेसबुक पेजवरून तसेच युट्युब चॅनलवरून बघू शकता.

२० फेब्रुवारी, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता, तुम्ही पुढील कोणत्याही लिंकद्वारे लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता.

https://youtu.be/1Vhy6DCae2U

फेसबुक: https://facebook.com/punecollective
युट्युब: https://www.youtube.com/c/punecollective

कॉम्रेडगोविंदपानसरेस्मृतीव्याख्यान

#श्रमिकप्रतिष्ठान #पुणेकलेक्टिव #जागरलोकशाहीचा

#GovindPansare #PuneCollective

#IdeasOfIndia #Democracy #Freedom #Pluralism