श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर आयोजित, काॅम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला – २०१९ मधील व्याख्यानांच्या “भारतावरील आर्थिक संकट” या डॉ. मेघा पानसरे यांनी संपादन केलेल्या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ रविवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी, संध्याकाळी ५.३० वाजता होत आहे.
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, समाज विज्ञान अकादमी, पुणे आणि पुणे कलेक्टिव्ह संयुक्तपणे आपणा सर्वांना या कार्यक्रमास आमंत्रित करीत आहे.
८ ते १४ डिसेंबर, २०१९ या कालावधीत शाहू स्मारक भवन, काेल्हापूर येथे पार पडलेल्या ‘काॅम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाले’तून ‘भारतावरील आर्थिक संकट’ या विषयाचा विविध अंगांनी वेध घेण्याचा प्रयत्न झाला. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर, विचारवंत सहभागी झाले व त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. त्यातून भारतातील सर्वसामान्य जनतेच्या जगण्यामरण्याशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचारमंथन झाले. मार्च, २०२० पासून सुरू झालेल्या काेविड-१९ महामारी संकटामुळे २०२० ची व्याख्यानमाला व २०१९ मधील व्याख्यानांचे पुस्तक प्रकाशन नियाेजित वेळेत हाेऊ शकले नाही. हा कार्यक्रम आपण आता ऑनलाईन स्वरूपात, समाज माध्यमांतून करत आहोत.
पुस्तकात प्रा. चंद्रकांत केळकर, कॉ. मुक्ता मनोहर, श्री. देवीदास तुळजापूरकर, प्रा. करमसिंह राजपूत, प्रा. मारोती तेगमपुरे, प्रा. मिलिंद मुरुगकर व प्रा. श्रीनिवास खांदेवाले यांची व्याख्याने आहेत.
या पुस्तकाचं प्रकाशन, राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ कॉ. अजित अभ्यंकर यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने ‘बेरोजगारी: भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान‘ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जे. एफ.पाटील, कोल्हापूर हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.
फेसबुक : https://facebook.com/punecollective
युट्युब : https://www.youtube.com/c/punecollective
ट्विटर : https://twitter.com/punecollective
वेबसाईट : https://punecollective.in
इंस्टाग्राम : https://instagram.com/punecollective
टेलिग्राम : https://t.me/punecollective
मेलिंग लिस्ट : http://eepurl.com/ha9mXT