धाकड़

पुणे कलेक्टिव्ह आयोजित, मंगळवार, ९ मे २०२३ रोजी होणाऱ्या पुढील सत्रात आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण देश खेळाडू देत असणाऱ्या एक मोठ्या संघर्षाचा साक्षीदार झाला आहे. विशेषत: हा कुस्तीपटूंनी उभारला लढा आहे.

अनेक वरिष्ठ खेळाडूंनी लैंगिक छळाच्या तक्रारी वारंवार नोंदवूनही, कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध कसलीही कारवाई झाली नाही. हि घटना२०१३ च्या लैंगिक छळ प्रतिबंक POSH कायदा तसेच विशाखा मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन करणारी आहे. यावरून फक्त WFI नाही तर भारतातील इतरही विविध क्रीडा संघटनांमध्ये संस्थात्मक पातळीवरून होणारे शोषण पुन्हा एकदा समोर आले आहे.

या सर्व बाबतीत राजकारण्यांकडून अधिकृत पदांचा उघड गैरवापर, याविरुद्ध बोलणाऱ्यांना धमकावण्यासाठी, गप्प करण्यासाठी आरोपींकडून केला जाणारा बळाचा वापर वारंवार दिसून येत आहे. असे असताना देखील सरकारचा कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव स्पष्ट दिसत आहे. हे अतिशय दुःखद व संताप निर्माण करणारं आहे.

पूणे कलेक्टीव्ह या शोषणाचा जाहीर निषेध नोंदवून स्वतःच्या आत्मसन्मानाच्या लढाईत उतरलेल्या या सर्व खेळाडूंसोबत असल्याची ग्वाही देत आहे.

ह्या लढ्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी, आम्ही तुम्हाला मंगळवार, दिनांक ९ मे २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देत आहोत.

पुणे कलेक्टिव्हच्या या सत्रात, आपल्या सोबत संवाद साधणार आहेत, जगमती सांगवान, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन्स असोसिएशनच्या (AIDWA) राष्ट्रीय उपाध्यक्षा, तसेच भीम पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू, आणि इंदू अग्निहोत्री, सेंटर फॉर विमेन्स डेव्हलपमेंट स्टडीजच्या(CWDS) माजी संचालिका.


दोन्ही वक्ते प्रत्यक्ष आंदोलन स्थळावरील त्यांचे अनुभव आणि गेले अनेक दिवस सर्व विरोधांना सामोरे जात ठामपणे आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे आंदोलक खेळाडू यांचा आवाज आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील तसेच या लढ्याची राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ भूमिका उलगडून दाखवतील.

आपल्या खेळाने देशाची मान उंचावणाऱ्या या खेळाडूंचा पर्यायाने देशाचा आत्मसन्मान जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठीच आपण एकत्र येऊया.

हे सत्र हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.

Watch this space for updates.

Facebook: https://facebook.com/punecollective

Youtube: https://www.youtube.com/@punecollective

Twitter: https://twitter.com/punecollective

Instagram: https://instagram.com/punecollective