ब्रेक द चेन

पुणे कलेक्टिव्हच्या अकराव्या भागात आपणा सर्वांचं स्वागत. यावेळीचा आपला कार्यक्रम शनिवार, दिनांक १ मे २०२१ रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.

आज “सिस्टिमला” कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात आलेले अपयश आपण सगळे अनुभवतो आहोत. हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, औषधं आणि ऑक्सिजनची कमतरता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आज आपल्या डोळ्यासमोर आहे. या लाटेने आपल्या अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत.

दिसू नये म्हणून कितीही पत्रे मारले तरी स्मशानातून उठणारे धुराचे लोट आपल्या सगळ्यांचे श्वास गुदमरवून टाकता आहेत. एकामागोमाग एक अशा केवळ निवडणुकांच्या नियोजनात व्यस्त असणारे भाजप सरकार या राष्ट्रीय आपत्ती नियोजनात मात्र संपूर्ण अयशस्वी ठरताना दिसत आहे. दीड वर्षात कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी कोणतीही ठोस कृती योजना तयार केली गेली नाही. दुसऱ्या लाटेचे आकडे समोर दिसत असतानां फेब्रुवारी व मार्च मध्ये प्रधानमंत्र्यांनी नॅशनल टास्क फोर्सची मिटिंग देखील घेतली नाही. याला अक्षम्य दुर्लक्ष याहून वेगळं काही म्हणताच येणार नाही.

स्वातंत्र्यानंतर भारताने अथक परिश्रम घेऊन लसीकरणाचे यशस्वी कार्यक्रम घेतले. सर्वांना मोफत लस ही आपली फार मोठी गौरवास्पद कामगिरी होती. पण आज केंद्र सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, सामान्य नागरिक हा त्यांच्यासाठी कधीही महत्वाचा नव्हता. उलट ते अजूनही त्यांच्या भांडवलदार दोस्तांना खुश ठेवण्यात मग्न आहेत.

आज सध्यातरी लस हा एकमेव पर्याय समोर दिसत आहे. पण जनतेमध्ये साशंकता आहे. त्यामुळे त्याविषयीच्या प्रबोधनाची गरज देखील निर्माण झाली आहे. जिवनाचा, आरोग्याचा अधिकार हा आपला संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. पण आज या अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला पुणे कलेक्टिव्हच्या ‘ब्रेक द चेन’ या कार्यक्रमात आमंत्रित करत आहोत. यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत, एम.डी., रोगप्रतिकारक तज्ञ तसेच भारत विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या, डॉ. विनिता बाळ; अर्थतज्ञ, प्राध्यापक तसेच केरळ राज्य नियोजन मंडळ सदस्य, डॉ. आर रामकुमार आणि जनसामान्यांना आरोग्य शिक्षण समजावून सांगणारे एम.बी.बी.एस, एम.डी. व नॅशनल हेल्थ सर्विस, यु.के येथे कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील.

महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिन या अनुषंगाने आपण सगळे एकत्र येऊन या संकटांच्या साखळ्या तोडण्याचा निर्धार करू.

हा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असणार आहे. शनिवार, दिनांक १ मे २०२१ रोजी, संध्याकाळी ६ वाजता तुम्ही पुढील कोणत्याही लिंकद्वारे लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता.

फेसबुक: https://facebook.com/punecollective

युट्युब: https://www.youtube.com/c/punecollective

ट्विटर: https://twitter.com/punecollective

वेबसाईट: https://punecollective.in

जागरलोकशाहीचा #पुणेकलेक्टिव्ह
PuneCollective #IdeasOfIndia
Democracy #Freedom #Pluralism
ब्रेकदचेन #BreakTheChain