बोल कि लब आज़ाद हैं तेरे …

पुणे कलेक्टिव्हच्या या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत.

हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.

आज भारत नावाच्या संकल्पनेवर अतिशय सुनियोजित हल्ले सुरु आहेत. त्याचवेळी या विकृतींना रोखू पाहणाऱ्यांनाच आज शत्रू घोषित करून बंदी केलं जात आहे. जे आज समतेची, एकतेची, मानवी मूल्यांची लढाई लढता आहेत, त्या सर्वांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सत्तेच्या दमनाला सामोरं जावं लागत आहे. कधी पत्रकारांनी सत्य परिस्थिती दाखवली म्हणून त्यांना बंदी केलं जातं आहे, तर कधी मूलभूत मानवी अधिकार मागणाऱ्यांनाच दंगली घडवून आणायचे खोटे आरोप लावून बंदी केलं जात आहे.

आज पेगॅसस हेरगिरी प्रकरण आपल्यासमोर आहे. या हेरगिरीतून राजकीय विरोधक, न्यायव्यवस्था, सुरक्षा दल, सीबीआय, नोकरशाह इतकेच नव्हे तर अगदी सामान्य नागरिक देखील सुटले नाही आहेत. अशा तऱ्हेने व्यक्तींवर पाळत ठेवली जाणे ही व्यक्तीच्या खाजगीपणाच्या मूलभूत अधिकारावर आणलेली गदा तर आहेच त्याचवेळी तो लोकशाहीच्या मूल्यांच्या पायावर घातलेला घाला देखील आहे. आपले टीकाकार, राजकीय विरोधक यांना चिरडण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते हे यातून आपल्याला पुन्हा एकदा दिसले आहे.

या सगळ्याकडे दुर्लक्ष करणे व सत्ताधार्यांना सत्तेचा अनिर्बंध गैरवापर करू देणे याची परिणीती प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यामध्ये होणं अपरिहार्य आहे. आणि जर हे होऊ द्यायचं नसेल तर आज आपल्याला याविरोधी एकत्र येऊन पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी लढावं लागेल, सत्य हे निर्भीडपणे बोलावं लागेल.

या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला ‘बोल कि लब आज़ाद हैं तेरे‘ या चर्चासत्रात आमंत्रित करत आहोत. यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत, मानव अधिकार कार्यकर्त्या, ‘पिंजरा तोड’ संस्थेच्या संस्थापक सदस्य, नताशा नरवाल; शिक्षक, लेखक, संपादक तसेच दलित आदिवासी अधिकार आंदोलनचे कार्यकर्ते, केशव वाघमारे; तसेच मा.क.प. पॉलिट ब्युरो सदस्य, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या उपाध्यक्षा व पूर्व लोकसभा सदस्य, सुभाषिनी अली.

आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सर्व एकत्र येउ.
हा कार्यक्रम मराठी आणि हिंदीमध्ये असेल.

शनिवार, दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी , संध्याकाळी ६ वाजता पुढीलपैकी कोणत्याही लिंकद्वारे तुम्ही सहभागी होऊ शकता.

Facebook: https://facebook.com/punecollective

Youtube: https://www.youtube.com/c/punecollective

Twitter: https://twitter.com/punecollective

Website: https://punecollective.in

#पुणेकलेक्टिव्ह #PuneCollective
#स्वातंत्र्यदिन #IndependanceDay