भारत की छाप

पुणे कलेक्टिव्ह, AIPSN, शंकर ब्रह्मे ग्रंथालय आणि नवनिर्मिती लार्निंग फाउंडेशन आयोजित,

भारत की छाप ही १९८९ ची निर्मिती असणारी, फ्रान्सचा ज्यूल्स व्हर्न पुरस्कार मिळवणारी, छंदिता मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेली एक तासांच्या तेरा भागांची विज्ञानचित्रपट मालिका. ज्यामध्ये पाषाण युगापासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत भारतातील विज्ञानाचा, त्याच्या विकासाचा वास्तववादी मागोवा घेतला आहे.

ऑल इंडिया पिपल सायन्स मुव्हमेंटने या मालिकेवर आधारित एक दिनदर्शिका तयार केली आहे. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने, रविवार, दि. ३ मार्च २०२४ रोजी, संध्या. ५ वा. पुढील कार्यक्रम आयोजित केला आहे.

भारत की छाप

– प्रमुख वक्ते

विवेक माँटेरो, सुहास परांजपे, पूर्णिमा बूरटे आणि सत्यजीत रथ

स्थळ –
शंकर ब्रम्हे ग्रंथालयाचे लोकायत सभागृह,
इन्फिनिटी काँप्लेक्स, ३ रा मजला,
१२९ ब/२, कॅनरा बँकेसमोर
लॉ कॉलेज रस्ता, पुणे ४११००४

वेळ –
रविवार, दि. ३ मार्च २०२४
संध्याकाळी ५ वाजता

हे सत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.

‘भारत की छाप’ सर्व एपिसोड पुणे कलेक्टीव्हच्या युट्युबवर अपलोड केले आहेत. पुढील लिंकद्वारे आपण ते बघू शकता

Watch this space for updates.

Website: https://punecollective.in

Facebook: https://facebook.com/punecollective

YouTube: https://www.youtube.com/@punecollective

Twitter: https://twitter.com/punecollective

Instagram: https://instagram.com/punecollective