डार्लिंग,डार्विन काय म्हंतोस!

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार व प्रसार करणे हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाचे घटनात्मक कर्तव्य आहे. या निमित्ताने आम्ही जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या सर्व व्यक्ती, चळवळी तसेच संघटनांच्या कार्याला सलाम करतो.

या पार्श्वभुमीवर आम्ही ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क आणि पुणे कलेक्टिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ‘डार्लिंग,डार्विन काय म्हंतोस!’ या कार्यक्रमात आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत.

हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी, संध्याकाळी ६.०० वाजता आयोजित केला आहे.

या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती आपल्याशी संवाद साधणार आहेत.

  • तुमचं आमचं उत्क्रांतीविज्ञान – डॉ. मिलिंद वाटवे
  • डार्विनचा अमीट ठसा – डॉ. शंतनु अभ्यंकर
  • मानवाच्या उत्क्रांतीत खगोलशास्त्राचे योगदान – डॉ. अनिकेत सुळे

डार्विन दिन, खगोलशास्त्र दिन आणि विज्ञान दिन निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व नागरिक, कार्यकर्ते, लोकसंघटना आणि शैक्षणिक संस्थांनी सहभागी व्हावे असे आम्ही आवाहन करत आहोत.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी, संध्याकाळी ६.०० वाजता तुम्ही पुणे कलेक्टिव्हच्या सोशल मीडियावरून या लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता.

हा कार्यक्रम मराठीत असणार आहे.

Watch this space for updates.

Facebook: https://facebook.com/punecollective

Youtube: https://www.youtube.com/@punecollective

Twitter: https://twitter.com/punecollective

Instagram: https://instagram.com/punecollective

Website: https://punecollective.in

To subscribe to our Mailing List: https://tinyurl.com/pa5hwrx5