ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क आणि पुणे कलेक्टिव्ह आणि इतर सहभागी संस्थांतर्फे आज रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ ला ५ वाजता होणाऱ्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आम्ही भारताचे लोक’ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना स्मरून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादाचा प्रसार करण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था, संघटना आणि चळवळींना आमचा सलाम !
उत्तुंग काम करत असलेल्या अनेक व्यक्तींना या सत्रात तुम्ही भेटू शकाल.
‘गॅलिलिओ ते जे.डब्ल्यू.एस.टी – वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासात खगोलशास्त्राची भूमिका’ या विषयावर डॉ. मनोज पूर्वांकर बोलतील. त्यानंतर ‘छद्मविज्ञान’ या विषयावरील पॅनेल चर्चेत डॉ. अनंत फडके, डॉ. मुजतबा लोखंडवाला आणि डॉ. प्रियदर्शिनी कर्वे सहभागी होतील. संवादक आहेत डॉ. शमीन पडळकर.
आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसार करणे, तसेच डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्येच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिक, लोकसंघटना, शैक्षणिक संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.
This session will be in Marathi and English.
Facebook:
https://facebook.com/punecollective
https://www.facebook.com/navnirmiti
https://www.facebook.com/indiejournal
https://www.facebook.com/samajvidnyan
Youtube: https://www.youtube.com/c/punecollective
Twitter: https://twitter.com/punecollective
#पुणेकलेक्टिव्ह#PuneCollective#AIPSN