शहीद-ए-आजम कॉम्रेड भगतसिंग यांच्या क्रांतिकारी वारशाची जपणूक करण्यासाठी वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगड घालत टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.
“सत्य, सौंदर्य आणि चांगुलपणा” जिथे आहे अशा जगाची फक्त कल्पनाच नव्हे तर ते निर्माण करण्याच्या हेतूनं कार्य करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आपण एकत्र येउन भगत सिंग यांचे स्मरण करू, वाचू आणि चर्चा करू. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, पत्रकार तसेच सर्व समविचारी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवावा असे पुणे कलेक्टिव्ह आपल्याला आवाहन करत आहे.
१ मार्च, २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता, तुम्ही पुढील कोणत्याही लिंकद्वारे लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता.
फेसबुक: https://facebook.com/punecollective
युट्युब: https://www.youtube.com/c/punecollective
हा कार्यक्रम इंग्रजी आणि हिंदी मधून होईल.