पुणे कलेक्टिव्हच्या बाराव्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ५ जून २०२१ रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
कोविड-१९ च्या उद्रेकाने आज आपले जग हादरले आहे. आपण अद्यापही आरोग्याच्या मूलभूत सुविधा, वैद्यकीय ऑक्सिजन आणि औषधे यासाठी लढा देत आहोत. या दरम्यान आपण पश्चिम आशियात नुकत्याच झालेल्या भयानक घटना पाहिल्या.
इस्रायलने ११ दिवस केलेल्या गाझा बॉम्ब हल्ल्यात सुमारे ६५ मुलांसह सुमारे २५० पॅलेस्टिनी लोकं ठार झाले. अनेक इमारती, घरे आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्या. गाझा पट्टीमधून केल्या गेलेल्या हल्ल्यात इस्राईलचे १२ लोक ठार झाले.
गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे कारण या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्याचा प्रयत्न दिसत नाही आहे. सततची युद्धं आणि त्या नंतरचे विराम हा या प्रश्नावरील तोडगा नाही. पॅलेस्टीनी लोकांना इस्त्रायली सैन्याकडून होणाऱ्या हिंसाचाराचा सामना वारंवार करावा लागत आहे आणि जोपर्यंत इस्राईल बळकावलेला भूभाग सोडत नाही तोवर हे संपणार नाही. हा लढा केवळ पॅलेस्टिनी लोकांचा नाही तर ज्या कुणाला न्याय, सन्मान आणि कायदा तसेच मानवी मूल्यांशी बांधिलकी वाटते अशा सर्वांचा आहे.
या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला या चर्चासत्रात आमंत्रित करत आहोत.
यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत, जेष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक व भाष्यकर्ते, निळू दामले; तसेच आर्थिक धोरण संशोधक, दि इंटरनॅशनलच्या सहाय्यक संपादक व पॅलेस्टिनिअन पिपल्स पार्टी सदस्या, अरवा अबू हशहश आणि इतिहासकार, लेखक, लेफ्टवल्ड बुक्सचे मुख्य संपादक तसेच ट्रायकॉन्टिनेन्टल संस्थेचे संचालक, विजय प्रशाद.
आपल्या ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्याच्या वारस्याला स्मरून वसाहतवादी ताकदीच्या विरोधातील या संघर्षामध्ये पॅलेस्टाईन सोबत उभे रहाण्यासाठी आपण सर्व एकत्र येउयात.
हा कार्यक्रम मराठी आणि इंग्रजीमध्ये असेल.
दिनांक ५ जून २०२१ रोजी , संध्याकाळी ६ वाजता पुढीलपैकी कोणत्याही लिंकद्वारे तुम्ही सहभागी होऊ शकता.
Facebook:
https://facebook.com/punecollective
Youtube:
https://www.youtube.com/c/punecollective
Twitter:
https://twitter.com/punecollective
Website:
https://punecollective.in