पुणे कलेक्टिव्हच्या दहाव्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २७ मार्च २०२१ रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
लोकशाहीतील मतांतराचा अन्वयार्थ !
सुमारे १२० दिवस सुरु असणाऱ्या किसान आंदोलनात आजपर्यंत ३०० हुन अधिक शेतकरी शहिद झाले आहेत, एका बाजूला सरकारशेतकऱ्यांच्या लोकशाही हक्कांची पायमल्ली करताना दिसत आहे तरीही लाखो शेतकऱ्यांनी आपला संयम ढळू न देता शांतिपूर्वक आणि लोकशाही मार्गानी आपला लढा पुढे चालू ठेवला आहे.
गेल्या काही वर्षात केंद्र सरकार आपली फासीवादी मूठ अधिकाधिक आवळताना दिसून येत आहे. जनतेचा आवाज मांडणाऱ्या स्वतंत्र वृत्तसंस्था, माध्यमं यांच्यावर विविध मार्गानी दबाव आणला जात आहे. कामगार, आदिवासी, दलित यांच्या हक्कांसाठी तसेच पर्यावरणासाठी लढणाऱ्यांवर पोलिसी दडपशाही सुरु आहे.सिनेमा, वेब सिरीज आणि नाटक यांच्यावर प्रतिगामी सेन्सॉरशिप लादली जाऊन अभिव्यक्तीची गळचेपी करण्यात येत आहे. स्टॅंड-अप कॉमेडी करणाऱ्यांना पोलीस यंत्रणेच्या दमनाला सामोरे जावे लागत आहे. लोकांच्या व्यथा मांडणाऱ्या पत्रकारांवर एपिडेमिक ऍक्ट, डिझास्टर ऍक्ट, देशद्रोह कायदे इत्यादींच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत.
देशद्रोह कायद्यांचा वापर ब्रिटिशांनी स्वातंत्र्य संग्रामामधील नेत्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी केला होता त्याच प्रकारच्या कायद्यांचा आधार घेत आजही लोकशाहीमध्ये मत-मतांतरे दडपली जात आहेत, गेल्या पाच वर्षात देशद्रोह कलम लावल्या जाणाऱ्या केसेसमध्ये दरवर्षी साधारण २८% इतकी वाढ होत आहे.
सत्तेत बसलेल्या त्याचसोबत कुंपणावर असलेल्या लोकांना हे पुन्हा एकदा निक्षून सांगण्याची वेळ आली आहे की, लोकशाहीतील मत-मतांतरे म्हणजे देशद्रोह नसतो. प्रत्येकाला मत असणे हा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येकाला ते मत मुक्तपणे मांडता येणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे.
या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला पुणे कलेक्टिव्हच्या ‘लोकशाहीतील मतांतराचा अन्वयार्थ’ या कार्यक्रमात आमंत्रित करत आहोत.
यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या, फिल्म मेकर तसेच ट्रॉली टाइम्स या शेतकऱ्यांच्या आवाज असणाऱ्या पत्रकाच्या संपादिका, नवकिरण नत्त; जेष्ठ पत्रकार, लेखक, टीव्ही अँकर तसेच राज्यसभा टीव्हीचे माजी कार्यकारी संचालक, उर्मिलेशी आणि प्रसिद्ध विचारवंत, लेखक, राजकीय शास्त्रज्ञ व EPW चे संपादक, प्रा. गोपाल गुरु.
हा कार्यक्रम मराठी आणि हिंदीत असणार आहे.
शनिवार, दिनांक २७ मार्च २०२१ रोजी, संध्याकाळी ६ वाजता तुम्ही पुढील कोणत्याही लिंकद्वारे लाईव्ह सेशनमध्ये सहभागी होऊ शकता.
फेसबुक:
https://facebook.com/punecollective
युट्युब:
https://www.youtube.com/c/punecollective
ट्विटर:
https://twitter.com/punecollective
वेबसाईट:
https://punecollective.in