पुणे कलेक्टिव्हच्या सहाव्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
शेतकऱ्यांचा असूड!
आज देशभरात हजारो शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधात लढाई लढत आहेत. त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तसेच विरोधी पक्षाच्या मतदानाच्या संविधानिक हक्काला नाकारत सत्ताधार्यांनी लोकशाही तत्वांचा दिवसाढवळ्या खून करत संसदेमध्ये कृषी विषयक तीन विधेयकं मंजूर करून घेतली. देशाला आणि देशातील लोकांना त्रासदायक परिणाम भोगावे लागतील अश्या कायद्यांचा पुनर्विचार होणे अत्त्यावश्यक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या या शेतीच्या, तिला आपल्या श्रमानं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पर्यायाने आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी निगडित असणाऱ्या या घटना सखोलपणे जाणून घेणे हे गरजेचे झाले आहे.
या सर्व पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला कृषी विधेयकाशी संबंधित या चर्चासत्रात आमंत्रित करत आहोत. यामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत माजी आमदार, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, राजू शेट्टी; त्याचसोबत शेती आणि राजकारण विषयक सातत्याने लिखाण करणारे, इंडियन एक्सप्रेस पुणेचे सहसंपादक, पार्थसारथी बिस्वास आणि शेतकरी नेते व अखिल भारतीय किसान सभेचे, महाराष्ट्र सचिव, अजित नवले.
हा कार्यक्रम मराठी आणि हिंदी आणि इंग्रजीत असणार आहे.
#जागरलोकशाहीचा #पुणेकलेक्टिव्ह#PuneCollective #PuneCollective2020#IdeasOfIndia #Democracy #Freedom #Pluralism