पुणे कलेक्टिव्हच्या चवथ्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२० रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
न्यायालयीन कर्तव्ये आणि लोकशाही अधिकार!
न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा एक महत्वाचा घटक आहे. संविधानिक न्यायालये आपल्या घटनात्मक अधिकारांचे रक्षक आहेत. न्यायालयांची बांधिलकी ही संविधानाशी, लोकशाही मूल्यांशी तसेच मूलभूत मानवी अधिकारांशी असणे अपेक्षित आहे. पण गेल्या काही वर्षात ही व्यवस्था याच्याशी फारकत घेताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर न्यायव्यवस्था, तिची संविधानिक जवाबदारी आणि लोकशाहीमध्ये नागरिकांची कर्तव्ये या अनुषंगाने सर्वोच न्यायालयाचे माजी न्यायाधीश ज. चेलमेश्वर आणि सामाजिक कार्यकर्ते आणि आयएलएस लॉ कॉलेजचे सहायक प्राध्यापक डॉ. नितीश नवसागरे आपल्याशी संवाद साधणार आहेत.
हा कार्यक्रम मराठी आणि इंग्रजीत असणार आहे.
#जागरलोकशाहीचा #पुणेकलेक्टिव्ह
#PuneCollective #PuneCollective2020
#IdeasOfIndia #Democracy #Freedom #Pluralism