पुणे कलेक्टिव्हच्या तिसऱ्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत!
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
हम सायन्स के तरफ से है ।
वैज्ञानिक दृष्टीकोन तसेच विवेकाचा आवाज सर्वत्र पोहोचवणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून २० ऑगस्टला देशभरात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
पुणे कलेक्टिव्ह जनमानसात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या सर्व व्यक्ती, चळवळी तसेच संघटनांच्या कार्याला सलाम करते.
या निमित्ताने, IISER, NII चे प्राध्यापक, इम्युनॉलॉजिस्ट, डॉ. सत्यजित रथ, तसेच समुचित एन्विरोच्या कार्यकारी संचालिका, अक्षयऊर्जा क्षेत्रातील तज्ञ प्रियदर्शी कर्वे आणि NIAS बेंगळुरू येथील प्राध्यापिका, हवामान बदल क्षेत्रातील तज्ञ डॉ. तेजल कानिटकर आपल्याशी संवाद साधणार आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याचे महत्व, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर त्याचा अर्थ, वैज्ञानिक दृष्टिकोनावर होणारे हल्ले, त्यामुळे होणारे दूरगामी सामाजिक राजकीय परिणाम इत्यादी अनेक बाबींवर आपले वक्ते संवाद साधतील.
डॉ. दाभोलकरांना आदरांजली देण्यासाठी आणि त्यांचे काम पुढे घेऊन जात विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही आपणा सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रित करत आहोत.
हा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असणार आहे.
https://facebook.com/
#जागरलोकशाहीचा #पुणेकलेक्टिव्ह
#PuneCollective #PuneCollective2020
#IdeasOfIndia #Democracy #Freedom #Pluralism